VIDEO : भडकाऊ भाषणाकडे दुर्लक्ष करा; छगन भुजबळांचे मुस्लिम बांधवांना आवाहन - छगन भुजबळ न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
येवला ( नाशिक ):- येवल्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून, यावेळी ईदगहा मैदान येथे मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ तसेच आमदार नरेंद्र दराडे यांनीही नमाज पठण प्रसंगी उपस्थित राहिले होते. यावेळेस त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. 'कोरोनाचे नियम उठल्यावर रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज देशामध्ये भडकाऊ भाषण सुरू आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करावे. ज्या वेळेस निवडणुका येतात तेव्हा भडकाऊ भाषण करून हिंदू- मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे काम करतात. आणि त्याचा फायदा निवडणुकांमध्ये करून घेण्याकरता या गोष्टी चालू आहे. कोणी कितीही अशा भडकाऊ भाषण केले तरीही याकडे दुर्लक्ष करावे.' असे आवाहन भुजबळांनी केले.