Amol Mitkari : असुरांना लाजवेल अशी अमोल मिटकरी यांची वृत्ती, नाशिकमध्ये साधू- महंतांनी केली तक्रार - Amol Mitkari In Trouble

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 22, 2022, 6:22 PM IST

Updated : Apr 22, 2022, 9:22 PM IST

नाशिक : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ( NCP MLC Amol Mitkari ) विरोधात साधू- महंतांकडून पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला ( Complaint Against Amol Mitkari In Nashik ) आहे. ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधान ( Controversial Statement Against Brahman Community ) केल्याने अमोल मिटकरी चांगलेच अडचणीत सापडले ( Amol Mitkari In Trouble ) आहेत. त्यांच्या विरोधात नाशिकच्या साधू महंतांनी उपनगर पोलीस ठाण्यात ( Upnagar Police Station Nashik ) तक्रार अर्ज दाखल केला असून, पोलिसांनी कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा साधू महंतांनी दिला आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही सर्व संत समाज निषेध करतो. आज आम्ही साधू महंत, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी एकत्र येऊन मिटकरी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. असुरांना लाजवेल अशी अमोल मिटकरी यांची वृत्ती आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी सांगितलं आहे.
Last Updated : Apr 22, 2022, 9:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.