Eid Ul Fitr 2022 : छावणी ईदगाह येथे दोन वर्षांनी नमाज अदा; पोलिसांनी ड्रोनद्वारे ठेवले लक्ष, पाहा व्हिडिओ - औरंगाबादेत ईदचा उत्साहात
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - कोरोनाच्या दोन वर्षानंतर उत्साहात ईदचा ( Eid Ul Fitr 2022 ) उत्साह सुरु झाला. शहरातील सर्व मस्जिदीत सकाळी आठ ते नऊ या काळात मुस्लिम बांधवानी ईदची नमाज पठन केली. औरंगाबादच्या मुख्य ईदगाह येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा ( chhavani Eidgah in Aurangabad ) केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. देशात अमन आणि शांती प्रस्तापित होऊ दे अशी दुआ यावेळी करण्यात आली. तर देशात आणि राज्यात सुरु असणाऱ्या मुस्लिम विरोधी घटनांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून नमाज अदा केली गेली. कोरोना काळात दोन घरीच ईद ची नमाज घरीच अदा करावी लागली. त्यामुळे आपल्या नातेवाईकांना - मित्रांना भेटण्यास अनेक अडचणी होत्या. मात्र आता निर्बंध हटवल्याने नागरिकांनी उत्साहत सणं साजरा करायला सुरुवात केली. यावेळी पोलीस विभागाने सर्वत्र लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला. पोलीस विभागाने ड्रोन द्वारे टिपलेले क्षणचित्र ई टीव्ही भारत च्या प्रेक्षकांसाठी खास.