Actor Sharad Ponkshe : देशात समान नागरी कायदा झाला नाही तर आणखी एक मुस्लिम राष्ट्र तयार होईल - शरद पोंक्षे - शरद पोंक्षे समान नागरी कायदा
🎬 Watch Now: Feature Video

जालना - देशात समान नागरी कायदा (uniform civil code) आला नाही तर पुढच्या पाच ते दहा वर्षात आणखी एक मुस्लिम राष्ट्र तयार होण्याचा धोका अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe in Jalna) यांनी व्यक्त केला आहे. ते जालन्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यावेळी ते बोलत होते.. दोन मुस्लिम राष्ट्रांची काळजी करू नका, जे विभिषन असतात ते स्वत:हून रामाच्या बाजूने लढायला येतात, असे सावरकरांनी म्हटले आहे. 22 टक्क्यांवरून 35 टक्के झाल्यावर एका मुस्लिम राष्ट्राची निर्मिती होती.. त्यानुसार आपण सध्या 22 टक्क्यांवर येऊन थांबलो आहोत. त्यामुळे देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही तर पुढच्या पाच ते दहा वर्षात आणखी एक मुस्लिम राष्ट्र तयार होण्याचा धोका आहे, असे पोंक्षे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सध्या मतपेटीचे राजकारण सुरु असून याचाही धोका दिसायला लागला असल्याचे पोंक्ष यावेळी म्हणाले.