'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन - राहुल गांधी
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. नागपुरातही युवक काँग्रेसतर्फे नेते राहुल गांधी यांचे मुखवटे घालून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचे विमोचन भाजप कार्यालयातून करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याचा प्रकार घडला असून पंतप्रधान मोदी यांनीच या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलन करण्यापूर्वी आंदोलकांनी कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याने आंदोलनात कार्यकर्त्यांची संख्या फारच कमी असल्याने आंदोलन रेंगाळ्यासारखे वाटत होते.