VIDEO : प्रणयक्रिडेत मग्न असणाऱ्या सापाच्या जोडप्याला पकडणे भोवले, सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू - सर्पदंश
🎬 Watch Now: Feature Video

बुलडाणा - बुलडाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथील 22 वर्षीय राजू वसंता महाले या युवकाला प्रणयक्रीयेत मग्न असणाऱ्या सापाच्या जोडप्याला पकडने फारच महाग पडले असून सर्पदंश झाल्याने या युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाच्या घरासमोर मण्यार जातीच्या नर व मादीची प्रणयकिडा सुरु होती. दरम्यान या युवकाने सापांना पकडण्याचे वेडे धाडस केले. परंतु साप पकडण्याच्या प्रयत्नात सापांनी युवकाला चार ठिकाणी चावा घेतला आणि विष संपूर्ण शरीरात पसरले. उपस्थित नागरिकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे राजूने साप पडकण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते.