लसीकरणचा (vaccination) टक्का वाढवण्यासाठी सलमान खानची मदत घेणार - राजेश टोपे - corona vaccination
🎬 Watch Now: Feature Video
जालना - राज्यातील काही मुस्लिम बहुल भागात कोरोना लसीकरण कमी प्रमाणात झाले असून मुस्लिम समुदायाकडून कोरोना लसीकरणाला (vaccination) प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार मुस्लिम समाजातीतील नागरीकांमध्ये लसीकरण वेगाने होण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू आणि सेलेब्रिटींची मदत घेणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते. अभिनेता सलमान खान यांची फॅन फॉलोवर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांची लसीकरणासाठी मदत घेतल्यास नक्कीच फायदा होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मुस्लिम नागरीकांनी लसीकरण करून घेण्यासाठी सलमानचे आवाहन करणारे व्हिडिओ तयार केले जाणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात राहावी म्हणून नागरीकांनी लसीकरण तातडीने करून घेणे गरजेचे असून राज्य सरकारने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले.