legislative council elections 2021 : विधान परिषदेच्या दोन जागेंसाठी मतदान सुरू, कोण मारणार बाजी? - legislative council elections akola
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - स्थानिक स्वराज्य संस्थेतील अकोला वाशिम बुलढाणा विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतदानाला सुरुवात झाली आहे. हे मतदान अकोला येथील बी. आर महाविद्याल येथे होत आहे. दोन उमेदवारासाठी 822 मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेl. त्यामध्ये 389 पुरुष आणि 432 महिला मतदार आहेत. एकूण 22 मतदान केंद्रांवर हे मतदान होl आहे. भाजपकडून वसंत खंडेलवाल आणि शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.