संजय राठोड अडचणीत! जबाबासाठी पीडित महिला घाटंजी पोलीस ठाण्यात - sit team at ghatanji
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील एका महिलेने माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपासासाठी एसआयटी पथकाची स्थापना केली होती. हे पथक शनिवारी घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. तक्रारदार महिलेच्या गावात हे पथक जाणार आहे. यात पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही महिला जबाब नोंदविण्यासाठी घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
Last Updated : Aug 14, 2021, 1:57 PM IST