नाणार प्रकल्प : राज ठाकरेंनी मत का बदललं माहित नाही पण.., राऊत यांनी राज यांना केलं 'हे' आवाहन - नाणार प्रकल्प न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राजापूरच्या परिसरात नाणार प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका राज यांनी घेतली होती. मात्र आता का त्यांनी मत बदललं माहीत नाही. पण त्यांनी नाणारला समर्थन दिलं असेल तर त्यांनी राजापूर येथे जावं आणि तेथील लोकांची मतं जाणून घ्यावी, असे आवाहन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांना केलं आहे. तसेच नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेमध्ये दोन मतांचा प्रश्न नाही. आमची नाळ तेथील जनतेसोबत जुळलेली आहे, असे मतही विनायक राऊत यांनी व्यक्त केलं. याविषयी राऊत यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी...