Sangli Floods : चांदोलीत रेकॉर्डब्रेक 574 मिमिलिमीटर पाऊस; धरण 95 टक्के भरले - महाराष्ट्र महापूर
🎬 Watch Now: Feature Video
सांगली : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत रेकॉर्डब्रेक 574 मिलिमीटर पावसाची नोंद इथे झाली आहे. या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 95 टक्के भरल्याने धरणातून 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या 3 दिवसांपासून शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. गुरुवारी दुपारनंतर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झाला. संततधार पावसामुळे चांदोली धरणात 66 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण 95 टक्के भरले आहे. 34.40 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या 32.73 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पाण्याची आवक कायम असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात होत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने वारणा नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.