VIDEO : चिपळूण पाण्यात, लोकांना सुरक्षितस्थळी आणण्यास प्राधान्य - अनिल परब - chiplun news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12542522-thumbnail-3x2-parab.jpg)
महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळून शहर सध्या पाण्यात आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. जिल्ह्यासाठी पुण्याहून NDRF च्या दोन टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी दाखल झाल्या आहेत. आता या घटनेवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरीत पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी आणण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, असे परब यांनी म्हटले आहे.