Health Department Paper Leaked : आरोग्य विभाग गट 'क' भरतीचा पेपर फुटला, सायबर सेलकडे तक्रार - पुणे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आरोग्य विभागाच्या घेण्यात आलेल्या ड गटाच्या पेपरफूटीनंतर आता क गटाचा देखील पेपर फुटल्याचा आरोप (Health Department Group C Paper Leaked)परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी पुण्यातील सायबर सेलकडे (Pune Police Cyber Cell) तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ हा काही संपण्याच्या नाव घेत नाही. ड गटाच्या cत आरोग्य सहसंचालक (Health Joint Director) यांना अटक करण्यात आली आहे. आता क गटाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आरोप केल्यानंतर, पून्हा एकदा आरोग्य विभागाचा कारभार समोर आला आहे. ड आणि क गटाच्या परीक्षा रद्द करून या परीक्षा एमपीएससीच्याच (MPSC Exam) माध्यमातून घेण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे. जर परीक्षा रद्द झाली नाही तर, येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या विद्यार्थ्यांनी दिला. या विद्यार्थ्यांबरोबर बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी. तर पाहूया काय म्हणाले विद्यार्थी.