रायघोळ नदीच्या पुरातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांची मानवी साखळी - रायघोळ नदी मानवी साखळी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

जालना - भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गावाजवळील रायघोळ नदीला मोठा पूर आला. पुलावरून पाणी वाहत असल्याने सायंकाळी घरी परतणाऱ्या शेतकरी व महिलांनी मानवी साखळी करून या पाण्यामधून मार्ग काढला. यादरम्यान एका महिला पाण्यात पाय घसरल्यामुळे वाहून चालली होती. गावातील दिपक मुठ्ठे या तरुणाने प्रसंगावधान राखत तिला पाण्यामधून बाहेर काढले.