मुंबई : मानखुर्दच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - मुंबई मानखुर्द भाजी मार्केट बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 25, 2020, 5:27 PM IST

मुंबई - मानखुर्दमधील भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. मानखुर्द-गोवंडीमधील पीएमजीपी कॉलनी याठिकाणी सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. नागरिक या बाजारात कोणत्याही नियमाचे पालन न करता, मास्क न घालता बाजारात फिरतात. कोरोना संदर्भात राज्य व केंद्र सरकार तसेच महानगरपालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना गेल्या आठ महिन्यांपासून राबवल्या जात आहे. परंतु नागरिकांकडून या उपाययोजनांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.