परमबीर सिंग केंद्राच्या सहकार्यानेच देशाबाहेर पळून गेले - संजय राऊत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : अनिल देशमुख यांना ईडीने केलेली अटक दुर्दैवी आहे, ही कारवाई कायद्याला आणि नितीमत्तेला धरून नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आरोप करणारे पळून जातात आणि पहिल्याच भेटीत तपास न करता अटक केली जाते. हे ठरवून केलं जातं आहे असा आरोपही राऊत यांनी केला आहे. आम्ही भाजप नेत्यांच्या संपतीविषयी माहिती तपास यंत्रणांना दिली. पण अजून काहीच कारवाई केली नाही. हे घाणेरडं राजकारण करत आहात. आज जे टणाटणा उड्या मारत आहेत, उद्या ते तोंड लपवून पळून जातील. दिवाळीनंतर हे बाथरूममध्ये तोंड लपवून बसतील. पण आम्ही संयम पाळून आहोत. मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला. भाजप नेत्यांच्या दबावाला बळी पडत नाही त्यांना असं केल्याचे राऊत म्हणाले. हे लोक क्रूर आहे. राक्षस आहेत. आता कितीही उड्या मारा, 2024 नंतर पाहू. तेव्हा फक्त तुम्ही भूमिगत होऊ नका असेही राऊत म्हणाले. परमबीर सिंग विदेशात पळून गेले असतील त्याला केंद्र सरकार जबाबदार आहेत. केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय ते देशाबाहेर जाऊ शकत नाही असेही राऊत म्हणाले. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची सुमोटू दखल घेत इन्कम टॅक्सने कारवाई केली पाहिजे असेही राऊत म्हणाले. तर दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील असेही राऊत म्हणाले.