आषाढी वारी : पाहा कसा होतो मेंढ्यांचा रिंगण सोहळा... - पं
🎬 Watch Now: Feature Video
रिंगण सोहळा हे वारीतील प्रमुख आकर्षण मानले जाते. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या वारीमध्ये मेंढ्याच्या रिंगण सोहळ्यालाही विशेष महत्व आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये तुकाराम महारांच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी हे मेंढ्यांचे रिंगण होते. यावर्षीही मोठ्या उत्साहात तुकोबा-ज्ञानोबाच्या गजरात हा रिंगण सोहळा पार पडला. हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Last Updated : Jul 6, 2019, 3:55 PM IST