आमची लढाई एनसीबीशी नाही तर चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात - नवाब मलिक - our fight is against who is doing wrong, not against ncb says nawab malik
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड : आमची लढाई एनसीबीशी नाही. जो शासकीय अधिकारी असून चुकीचे काम करत आहे त्याविरोधात आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी सकाळी एक ट्विट करून पुन्हा एकदा वानखेडेंवर निशाणा साधला होता. यावर बोलताना आमची लढाई एनसीबीशी नाही असे ते म्हणाले. समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून नोकरी मिळवली आणि पुढं सुद्धा खोटे कामं करत राहिले. अशी अनेक कामे वानखेडे यांनी केली आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.