पुण्यात कोरोना परिस्थिती बिकट, रुग्णालयांमध्ये जागा मिळेना - पुणे कोरोना घडामोडी
🎬 Watch Now: Feature Video
शहरात गेल्या आठवडाभरापासून दररोज चार ते पाच हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. एकीकडे शहरातील रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शहरातील रुग्णालयात नव्या रुग्णांसाठी खाट उपलब्ध नसल्याचे गंभीर चित्र सध्या पुणे शहरात आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात दररोज दहा हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. एकंदरीतच पुणे आणि परिसरातील वाढती रुग्णसंख्या, शहरात उपलब्ध आरोग्य सेवा तसेच अचानक वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.