#Aditi Tatkare जेव्हा क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे बॅडमिंटन मैदानात उतरतात, पाहा VIDEO - अदिती तटकरेंचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल
🎬 Watch Now: Feature Video
रायगड : राजकारणाच्या मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत यश संपादन करणाऱ्या राज्य क्रीडामंत्री अदिती तटकरे यांचा बॅडमिंटन खेळतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अदिती तटकरे अतिशय कौशल्याने बॅडमिंटन खेळताना दिसतात. रायगडच्या पाली सुधागड येथे क्रीडा संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर तटकरेंनी बॅडमिंटनवर हात अजमावला. यावेळी शेकापचे नेते सुरेश खैरे त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून उभे राहिले. या दोघांमधील बॅडमिंटनचा सामना चांगलाच रंगला. यावेळी तटकरेंचे बॅडमिंटनमधील कौशल्य पाहून उपस्थितही अचंबित झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
Last Updated : Jun 30, 2021, 8:18 PM IST