एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ सांगलीतही विद्यार्थी रस्त्यावर... - सांगली एमपीएससी विद्यार्थी राज्य सरकारचा निषेध
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आज विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. राज्यभरात एमपीसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीतही हा उद्रेक पाहायला मिळाला आहे. राज्य सरकारकडून इतर परीक्षा आणि सर्व निवडणुका घेतल्या जातात. मग एमपीएससी परीक्षा 4 वेळा का पुढे ढकलण्यात आल्या, असा संताप व्यक्त करत राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, वेळेप्रमाणे परीक्षा झाली पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यानिमित्ताने आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे, सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी...