Nagpur BJP Protest PM Security Lapse : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक.. मौन पाळत नागपूरमध्ये घटनेचा निषेध - नागपूर भाजप आंदोलन पंतप्रधान सुरक्षेत चूक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 11, 2022, 6:10 AM IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी ( PM Narendra Modi Punjab Visit ) त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली ( PM Modi Security Lapse ) होती. या चुकीसाठी पंजाब सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत नागपूरमध्ये भाजपतर्फे मौन पाळत घटनेचा निषेध करण्यात ( Nagpur BJP Protest PM Security Lapse ) आला. नागपुरात अनुसूचित जाती जमाती भाजप सेलकडून संविधान चौकात मौन पाळत घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी सामाजिक अंतर आणि तोंडाला मास्क लावून आंदोलन करण्यात आले. निषेध करण्यासाठी कुठलीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी मास्क लावून, मौन पाळून पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पंजाब सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यामध्यमातून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी ( Punjab CM Charanjit SIngh Channi ) यांनी नरेंद्र मोदी यांचा दौऱ्यात प्रोटोकॉल पाळले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत केलेली ही चूक जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी केली. या प्रकरणात यंत्रणा सुरक्षा, पोलिस यंत्रणा तसेच पंजाब सरकारच्या यंत्रणेतील जबाबदार अधिकारी यांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. तसेच पंतप्रधान येत असतांना प्रोटोकॉलनुसार त्यांच्या स्वागतासाठी कोणीही पोहचत नाही हे चुकीचे आहे. देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या बाबतीत अशी जाणीवपूर्वक चूक होणे हे गंभीर बाब असल्याचेही भेंडे यावेळी म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.