Beating Pregnant Forest Guard : 'कुणी थोबाडात मारली तर त्याचा हात पकडण्याची हिंमत महिलांनी ठेवली पाहिजे' - गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर याने येथील महिला वनरक्षक सिंधू सानप (Beating Pregnant Forest Guard) आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून, त्यांच्या पोटात लाथा मारल्या आहेत, तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. या संतापजनक घटनेवर मंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यात घडलेली घटना ही मन उद्दिन करणारी आहे. खरंतर महिलांनी आता आरेला कारे करणं गरजेचं आहे. महिला या सक्षम आहेत. त्यामुळे कुणी आपल्याला मारले तर आपण त्याचा हात पकडायची हिंमत ठेवली पाहिजे, असा सल्ला मंत्री यशोमती ठाकुर यांनी दिला. तसेच साताऱ्यामध्ये महिला वनरक्षक महिलेला झालेली मारहाण ही निंदनीय आहे. जर महाविकास आघाडी सरकार असताना अशा गोष्टी कोणी करत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.