Uday Samant on Nitesh Rane Hearing : न्यायालयाच्या निर्देशानुसार यंत्रणा काम करेल - उदय सामंत - नितेश राणे जामीन अर्जावर उदय सामंत प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane Bail Rejected) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. यावर शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चारवेळा सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायला हवा. न्यायालयाने जे काही निर्णय दिलेला आहे त्याच्या आधीन राहून संबंधित यंत्रणा काम करतील, युक्तिवाद आता संपलेला आहे त्यावर न्यायालयाने निर्देश दिले आहेत. बाहेरच्या निकालाचं संबंधित यंत्रणा तंतोतंत पालन करेल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.