Mahaparinirvan Diwas 2021 : इंदुमिलमधील डॉ. बाबासाहेबांचे स्मारक 2014 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमीच - आनंदराज आंबेडकर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईतील चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर (Mahaparinirvan Diwas) आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्यानं काही अनुयायी संतापले. या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. यावर बोलताना रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर म्हणाले की, चैत्यभूमीवर यावेळी महापालिकेकडून कमी प्रमाणात सुविधा पुरवल्या आहेत. स्वच्छतागृहे, जेवण व नाश्त्याची सोय पालिकेने केली नाही व दानशूर व्यक्तींनाही करू दिली नाही, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
इंदुमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी विचारले असता (Anandraj ambedkar on Memorial of Dr. Babasaheb at Indu Mill) आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मी आजच इंदुमिल स्मारक जागेची पाहणी केली व अभियंत्यांना भेटलो. काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ही खेदाची गोष्ट आहे. हे स्मारक 2024 पूर्वी पूर्ण होईल असे वाटत नाही. गुजरातमधील सरकार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर दोन ते अडीच वर्षात स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा राहिला. मात्र मी इंदूमिलच्या जागेसाठी 2012 मध्ये आंदोलन केले होते व 10 वर्षानंतरही स्मारकाचे काम जैसे थे च आहे. काम लवकर पूर्ण करण्याची सरकारची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.