जालना मोती तलाव ओव्हरफ्लो, परिसरातील घरं गेले पाण्यात; नगरपालिकेच्या कारभारावर नागरिक संतापले - houses in the area flooded
🎬 Watch Now: Feature Video
जालना - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील असलेला मोतीतलाव दुधडी भरून वाहत आहे. दरम्यान, पाण्याला जोर असल्याने या तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी शहरातील मिल्लतनगर भागातील नागरिकांच्या घरात शिरले आहे. कित्येकांचा घरातील संसार पाण्यावर तरंगलेला दिसत आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी या परिसराती ड्रेनेज लाईन तुंबलेल्या आहेत. त्याकडे नगरपालिकेचे पुर्णत: दुर्लक्ष आहे. आणि त्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली असा संताप व्यक्त केला आहे. नगरपालिकेने ड्रेनेज लाईनचे कसलेच काम केलेले नाही असा आरोपही नागरिकांनी केला आहे.