#NisargaCyclone : 'सरकारचं अचूक नियोजन आणि प्रशासनाची तत्परता यामुळे मोठी हानी नाही' - aslam shaikh on nisarga cyclone
🎬 Watch Now: Feature Video
सरकारचं अचूक नियोजन आणि प्रशासनाची तत्परता यामुळे मोठी हानी नाही, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळ आज राज्याच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला होता. यासंदर्भात मागील काही दिवसांपासून खबरदारी घेण्यात येत होती. अखेर आज रायगडच्या किनाऱ्याला वादळाने धडक दिली. यानंतर किनारपट्टीसह सर्व भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस बरसला. मुंबईतदेखील याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला...