मुंबई : लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांची गर्दी; सहकार्य करण्याचे डॉक्टरांचे आवाहन - Mumbai corona vaccination program news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- देशासह राज्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य लसीकरणाच्या संदर्भात देशात अव्वल आहे. मुंबईकदेखील मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. लसींच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे.
गोरेगाव येथील लसीकरण केंद्र नेस्कोमध्ये मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. स्वयंसेवक आणि लाभार्थी यांच्यात काही प्रमाणात खटकेदेखील उडाले. आज मिस कॉल सेंटरमध्ये साडेचार हजार लस उपलब्ध आहेत. साडेतीन हजार लाभार्थ्यांना टोकन देण्यात आले आहेत. ही माहिती नेसको लसीकरण केंद्र आणि सेंटरचे डॉ. नीलम आंद्राडे यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. नीलम आंद्राडे यांनी केले आहे.