वाळवा तालुक्यात दमदार पाऊस; एका दिवसात 110 मि.मी.पावसाची नोंद
🎬 Watch Now: Feature Video
मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरवात झाली असून वाळवा तालुक्यात 110 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात मागील आठवड्यात पेरण्या नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, मात्र आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. बुधवारी-गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ती प्रतीक्षा संपली असून, छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पावसाच्या पाण्याने शेतीला शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. शिवाय, शेतात साचलेल्या पाण्यामुळे उगवलेले कोवळी पिके कुजून जातील की काय? अशी चिंता सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.