Amravati violence शहरात शांतता ठेवा, घटनेला कोणीही राजकीय वळण देऊ नये -पालकमंत्री यशोमती ठाकूर - Violent turn in Amravati
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - त्रिपुरा राज्यात कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत (Amravati violence) काल दुपारी एका समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात शहरातील पाच ते सात दुकानांची तोडफोड झाली व काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात (Amravati violence) तणाव निर्माण झाला होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. कालच्या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपाने (BJP) अमरावती शहर बंदचे आवाहन केलं आहे. दरम्यान कालच्या घटनेवर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी जनतेला शांततेच आवाहन केलं आहे. तसेच कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये, घटनेची सखोल चौकशी होईल, कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना शांतता राखावी असं आवाहन पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी केलं आहे.
Last Updated : Nov 13, 2021, 12:44 PM IST