तौक्ते चक्रीवादळाचा धोका कायम; मुंबईचे मोठे नुकसान - तौक्ते वादळ महाराष्ट्र

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 18, 2021, 11:48 AM IST

मुंबई - सोमवारी मुंबईनंतर आता तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. पण असे असले तरी या वादळाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसेच ताशी १२० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. खरंतर, कालच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती.अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांचे, घरांचे आणि गाड्यांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेने १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेने १९४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.