VIDEO Fire in Bhandup : भांडुपमध्ये भीषण आग, 9 वाहने जळून खाक - Fire in Bhandup 9 vehicles destroyed
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13775825-thumbnail-3x2-k.jpg)
मुंबई - आज (मंगळवारी) मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुंबईच्या भांडुप भागातील रमाबाई नगरात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. ( Fire in Bhandup ) ही आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाला परिसरात पसरल्या होत्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत परिसरात पार्क केलेल्या सात दुचाकी एक रिक्षा आणि एक कार जळाली होती. दरम्यान, भांडुप पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.