'जायकवाडी धरणाच्या मंजुरीनंतर विरोधकांकडून शंकररावांचा सत्कार, दिले होते ५०० शिव्या असलेले पत्र'
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी हे महाकाय धरण बांधून मराठवाड्याला पाणी मिळवून दिले. मात्र, यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेनी विरोध केला होता. त्याचे नेतृत्व आमदार दत्ता देशमुख यांनी केले. शेवटी जायकवाडी धरणाला होकार मिळाला. तरीही विरोधक थंड झाले नाही. त्यांनी अहमदनगरमधील सेवगावात चव्हाणांचा सत्कार करण्याचे ठरवले. त्यावेळी शंकररावांचे मोठे बंधूंनी सांगितले, की तिथे तुमच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यामुळे तुम्ही जाऊ नका, असे सांगितले. शंकररावांनी काहीही ऐकले नाही. ते कार्यक्रमाला गेले. त्यावेळी त्यांना मानपत्र म्हणून पाचशे शिव्या असलेले पत्र मंचावर दिले. पण, शंकररावांनी त्याठिकाणी जनतेला जायकवाडी धरण कसे उपयोगी आहे? हे अभ्यासूवृत्तीनं समजावून सांगितले. त्याच सभेमध्ये जनतेने शंकररावांना पाठिंबा दिला, असे यशवंतराव महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत यांनी सांगितले.