बावनकुळे सारखा अभ्यासू सहयोगी विधानमंडळात येतो आहे याचा आनंद - देवेंद्र फडणवीस - विनोद तावडे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13706591-99-13706591-1637590026356.jpg)
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे यांसारखा अभ्यासू सहयोगी विधानमंडळात येत आहे याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज (दि. 22) चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेसाठी उमेदरवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री म्हणून चांगले काम केलेले आहे. एक जागरूक लोकप्रतिनिधी कसा असतो हेदेखील त्यांनी सिद्ध केले. मागील दोन वर्षात पक्षाचे महामंत्री म्हणून त्यांनी चांगला काम केले आहे. त्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व विजय मिळवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून झालेली नियुक्ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पहिल्यांच महाराष्ट्राला राष्ट्रीय महामंत्री पदाचा मान मिळाला, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.