वाशिम ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात सहा ठिकाणी मतमोजणीला सुरुवात - वाशिम ग्रामपंचायत निवडणूक 2021

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 18, 2021, 11:13 AM IST

वाशिम - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज (१८ जानेवारी) जाहीर होणार आहे. गावा-गावात या निकालांची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. वाशिम जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या १ हजार २३३ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची आज मतमोजणी होत आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील सहा ठिकाणी मतमोजणीसाठी तयारी केली आहे. एकूण ३ हजार २२६ उमेदवारांच्या भाग्याच्या फैसला होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी इमरान खान यांनी..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.