कोरोना योद्ध्याच्या हस्ते 'प्रतिकात्मक कोरोना राक्षसा'वर अंत्यसंस्कार करून 2021चे स्वागत - विक्रोळी टागोरनगर लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाने 2020 या वर्षात जगभरात दहशत माजवली. लाखो लोकांचे जीव गेले. तर, या महामारीमध्ये आपले कुटुंब, नातेवाईक, घरादाराची चिंता असतानाही अनेक पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी, नर्सेस, पत्रकार यांनी कोरोनाशी टक्कर देत योद्धा म्हणून कार्य केले. दरवर्षी 31 डिसेंबरला नवीन वर्षाचे स्वागत विविध संकल्पनेतून साजरे करण्यात येते. नवे विचार, नव्या कल्पना घेऊन नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. यंदा कोरोनाचे सावट अजूनही गडद असले तरी 2020 वर्षाला निरोप देण्यासाठी विक्रोळीमधील टागोरनगर परिसरात स्थानिक नागरिकांनी कोरोनाचा प्रतिकात्मक राक्षस तयार केला. त्यावर कोरोना योद्ध्यांनी अंत्यसंस्कार करून त्याला जाळून 2020 या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात केली. कोरोनायोध्दे डॉ. योगेश भालेराव, नर्स-रसिका पवार, रेशमी घाग, विक्रोळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद रंशिवरे, पत्रकार विनोद मोहिते, सफाई कर्मचारी प्रशांत गायकवाड, समाजसेवक सुमित हेळेकर उपस्थित होते.