दादरच्या भाजी मार्केटमध्ये कोरोना नियमांचा फज्जा - दादर भाजी मार्केट लेटेस्ट बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सरकार, प्रशासन नागरिकांना नियम पाळण्याबाबत वारंवार सूचना करत आहे. मात्र, नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. भाजी मार्केट, फळे मार्केट यांचा समावेश जरी जीवनावश्यक वस्तूंमध्ये होत असला तरी त्याठिकाणी सामाजिक अंतर पाळणे हा नियम आहे. मात्र, दादर भाजी मार्केटमध्ये या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी याचा आढावा घेतला आहे.