VIDEO : वेरूळ लेणीच्या पायथ्याशी योग दिन साजरा - Yoga Day at Ellora Caves
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष व आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत आज औरंगाबादेतील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत योग दिन साजरा करण्यात आला. कोविड नियमांच्या मार्गदर्शक निर्देशांप्रमाणे भारतीय पुरातत्व विभागाच्या २० कर्मचाऱ्यांनी विलास बिराजदार या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने करत हा दिवस साजरा करण्यात आला. गीत नाटक अकादमीचे कलावंत सहाना बॅनर्जी यांनी सतार तसेच पंडीत रामदास पळसुले यांनी तबला या कलेचे सादरीकरण केले. भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला. कोविड काळात प्रतिकात्मकपणे हा योग दिवस जरी आपण साजरा करत असलो तरी आज योग घराघरात पोहोचला असून आरोग्यासाठी लोक रोज योग करतात.