क्रूज ड्रग्ज प्रकरण : अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात दिली तक्रार - Maharashtra latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - क्रूज ड्रग्ज प्रकरणात नवीन खुलासे केले जात आहेत, अशा स्थितीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. ज्यात असे म्हटले आहे की, 'समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्रे बनवली आहेत. याच्या आधारे आयआरएस नोकरीची चौकशी करावी. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात समीरने केलेले खुलासे हे सर्व खोटे आहेत.' यावर आता समीर वानखेडे विरोधात दाखला दिला तो खोटा आहे म्हणत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी कुर्ला पोलिसात तक्रार दिली आहे.
Last Updated : Oct 25, 2021, 11:06 PM IST