विकेंड लॉकडाऊन; स्वारगेट एस टी स्टँडवर प्रवाश्यांची तुरळक गर्दी - pune weekend lockdown
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यासह पूणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला परवानगी देण्यात आली आहे. दरोरोज गर्दीने भरलेले पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड आज ओस पडले आहे. स्टँडवर अतिशय तुरळक प्रवासी असून प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या संख्येनुसार बसेस सोडण्यात येत आहे. विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट येथील एस टी स्टँडचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी.