भारतीय खेळपट्टी विवाद : उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सोडले मौन - ajinkya rahane about pitch controversy
🎬 Watch Now: Feature Video

सध्या भारतीय खेळपट्टीबद्दल जगभरात मोठा विवाद सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी अहमदाबादच्या खेळपट्टीवर मतांतरे दिली आहेत. भारतातील स्पिनर्ससाठी उपयुक्त खेळपट्टी तयार केली गेली, जी कसोटी क्रिकेटच्या भविष्यासाठी योग्य नाही, असे मतही अनेकांनी दिले. या विवादानंतर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपले मत दिले. ''विदेशात खेळताना आम्ही खेळपट्टीबाबत तक्रार केली नाही'', असे अजिंक्य म्हणाला.४ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा कसोटी सामना रंगणार आहे.