Exclusive Interview: 'मुन्ना बदनाम' गाण्यासाठी वरीना हुसैनने 'अशी' केली तयारी - dabangg film latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बॉलिवूडमध्ये 'दबंग' चित्रपटातील 'मुन्नी बदनाम हुई' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मलायका अरोरावर हे गाणं चित्रीत झालं होतं. आता 'दबंग ३' चित्रपटातही खास आयटम सॉन्ग पाहायला मिळणार आहे. मात्र, 'मुन्नी बदनाम' एवजी 'मुन्ना बदनाम' असे हे गाणं आहे. या गाण्यात 'लव्हयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी वरीना हुसैन थिरकताना दिसणार आहे. तिने या गाण्यासाठी नेमकी कशी तयारी केली, याबाबत तिने 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला. २० डिसेंबरला 'दबंग ३' सिनेमागृहात झळकणार आहे.