B'day Spl: 'हॅप्पी बर्थडे सायरा बानो...! - saira bano films
🎬 Watch Now: Feature Video
'उनसे मिली नजर के मेरे होश उडगए' हे गाणं जेव्हाही ऐकायला मिळते तेव्हा चुलबुला अंदाज आणि सौंदर्याची खान असलेल्या सायरा बानोची नक्कीच आठवण येते. सायरा बानो आपल्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक होत्या. त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्यांने लाखो चाहत्यांची मने जिंकली. त्यांचा सहजसुंदर शैलीने चाहत्यांना भूरळ घातली. आज त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे. या खास क्षणी जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील या काही खास घडामोडी...