ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हैदराबादेत ईडी कार्यालयात हजर, पाहा व्हिडिओ - ड्रग्ज प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12958367-thumbnail-3x2-rakul.jpg)
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आज सकाळी हैदराबादमध्ये सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयाच्या बाहेर दिसून आली. रकुल प्रीत सिंगला 2017 मध्ये समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. रकुलला यापूर्वी सहा सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र रकुलने चौकशीसाठी वेळ मागितला होता त्यानंतर ईडीने रकूलला आज (3 सप्टेंबर) रोजी चौकशीसाठी बोलावले. ईडीने रकुल प्रीत सिंह सह अभिनेता राणा दग्गुबाती, रवि तेजा, नवदीप सह टॉलीवुडच्या 12 सेलेब्रिटींना चौकशीसाठी बोलावले आहे. हे प्रकरण चार वर्षापर्वीचे आहे. व मादक पदार्थाशी संबंधित आहे.