केआरकेला धडा शिकवल्याबद्दल मिका सिंग सलमानला म्हणाला, "बहोत अच्छा किया" - मिका सिंग सलमानला म्हणाला, "बहोत अच्छा किया"
🎬 Watch Now: Feature Video

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या वकिलांनी गुरुवारी म्हटले की, कमल आर खान याच्याविरूद्ध दाखल केलेला कायदेशीर खटला, नुकताच प्रदर्शित झालेल्या 'राधे' या चित्रपटाच्या रिव्ह्यूसाठी नसून सलमानला बदनाम करण्याबाबत आहे. केआरकेविरूद्ध कायदेशीर कारवाई केल्याबद्दल सुपरस्टारचे कौतुक करीत गायक मिका सिंह म्हणाला की, "सलमान भाईंने धडा शिकवायचे ठरवले आहे याबद्दल आनंद झाला.'' कमल खानने सलमानची बदनामी करणारा मजकूर प्रसिध्द केल्याबद्दल हा खटला आहे. या खटल्यानुसार सलमानने कमल खानवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे व्हिडिओ बनवून व अपलोड करून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक पोस्ट करण्याच्या विरोधात कायमस्वरुपी हुकूम मागितला आहे.