Sanjay Raut Challenged Amit Shah : 'आमच्या डोळ्यात डोळे घालून बोला' : संजय राऊतांचे अमित शाहांना आव्हान - संजय राऊत क्रिमिनल प्रोसिजर बिल
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : राज्यसभेत आज क्रिमिनल प्रोसिजर अमेंडमेंट बिल ( The Criminal Procedure Identification Bill 2022 ) सादर करण्यात आलं. यामध्ये अटक केलेल्या आरोपीच्या हाताचे, पायाचे ठसे, डोळ्यांच्या बुब्बुळाचे स्कॅन, यासह आरोपीची डीएनए चाचणी करण्याची तरतूद करण्यात आली ( Data permitted to be collected ) आहे. राज्यसभेत यावर चर्चा सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले ( Sanjay Raut On Criminal Procedure Bill ) होते. केंद्र सरकारने हा कायदा आणला हे चांगले आहे. अमित शाह लोकसभेत ( Amit Shah In Loksabha ) म्हणाले की, पोलिसांकडून या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही. मात्र, तुमची आरोपीची व्याख्या काय आहे? केंद्र सरकारच्या, भाजपच्या विरोधात बोलला की तो आरोपी होतोय. उद्या माझ्यासह विरोधकांना आरोपी दाखवून आमच्या विरोधातही या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असा दावा राऊत यांनी यावेळी केला. माझं गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान आहे की, तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलणार का की या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही?, अशा शब्दात राऊतांनी अमित शाह यांना आव्हान ( Sanjay Raut Challenged Amit Shah ) दिले. राऊत याप्रकरणी बोलत असतानाच राज्यसभा उपाध्यक्षांनी त्यांना बोलण्यापासून थांबवले. यावेळी राऊत चांगलेच आक्रमक झाले होते. राऊत म्हणाले, संविधानात म्हटलं आहे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मर्जीविरूद्ध साक्ष देण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही. कलम २० अनुसार प्रत्येक नागरिकाला न बोलण्याचा अधिकार आहे. त्याला कोणाही विरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव आणता येत नाही. नार्को ब्रेन मॅपिंग किंवा इतर कोणत्याही वैज्ञानिक चाचणी देखील केली जाऊ शकत नाही. त्यामुळेच २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नार्को टेस्टला बेकायदेशीर म्हटलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST