karad Shivjayanti: कराडमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत तरुणाईचा सळसळता उत्साह; आ. नितेश राणे देखील भारावले...
🎬 Watch Now: Feature Video
सातारा: छत्रपतींच्या पुतळ्यांची ठिकठिकाणी प्रतिष्ठापना, सार्वजनिक मंडळांनी केलेली आकर्षक सजावट, डौलाने फडकणारे भगवे झेंडे, भगव्या पताकांचे तोरण, रांगोळ्यांचा सडा, पारंपारिक वेशभूषा करून महिलांनी काढलेली बाईक रॅली, महाआरती, डीजेचा दणदणाट आणि तरूणाईचा सळसळता उत्साह कराडमधील शिवजयंती उत्सवातील शाही दरबार मिरवणुकीत पाहायला मिळाला. शिवजयंतीच्या निमित्ताने दोन दिवस संपूर्ण कराड शहर शिवमय झाले होते. अक्षय तृतीयेच्या दुसर्या दिवशी (रविवारी) सायंकाळी शिवजयंती उत्सवाची सांगता झाली. यावेळी कराडमधील मुख्य बाजारपेठ मार्ग शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता.
शहराला पोलीस छावणीचे स्वरूप: हिंदू एकताच्यावतीने दरवर्षी कराडमध्ये दोन दिवस शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव अतिभव्य प्रमाणात साजरा झाला. या उत्सवात दरवर्षी महिला आणि तरूणींचा सहभाग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरबार मिरवणुकीसाठी कराड तालुक्यातील गावोगावचे तरूण येतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरवणूक म्हणून कराडच्या शाही दरबार मिरवणुकीचा लौकीक झाला आहे. मिरवणुकीला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील स्वत: बंदोबस्तावर हजर होते. रमजान ईद, अक्षय्य तृतीया आणि शिवजयंती एकाच दिवशी आल्याने कराड शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.