Wrestler protest: दिल्लीत कुस्तीपटूंच्या आंदोलनाबद्दल चकार शब्द न काढल्याने सचिनच्या घराबाहेर काँग्रेसने लावला बॅनर - सचिन तेंडुलकर घर काँग्रेस बॅनर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई: दिल्लीत कुस्तीपटू आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या आंदोलनाबद्दल चकार शब्द न काढणाऱ्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही लक्ष्य केले आहे. मुंबई युवक काँग्रेसने बांद्रा वेस्ट पेरी क्रॉस रोड येथील सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर बॅनर लावले आहे. राष्ट्रीय मुद्द्यावर मौन बाळगण्यासाठी बॅनर लावले, जेथे भारतीय महिला कुस्तीपटूंनी डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.तुम्ही क्रीडा विश्वातील देव माणूस व भारतरत्न देखील आहात. मात्र जेव्हा क्रीडा विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचार विरोधात आवाज उठवत असताना तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही, असे बॅनर लावले आहे. बॅनरखाली युवक काँग्रेसच्या प्रवक्ता रंजीता गोरे यांचे नाव आहे. सचिन तुम्ही मूग गिळून गप्प का, असा सवालही विचारला आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनीदेखील सचिन तेंडुलकर टीका केली होती. त्यांनी ट्विट करत म्हटले, की भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने तुमची राज्याच्या 'स्वच्छ मुखअभियान'साठी स्माइल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केल्याने आनंद झाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, आमच्या कुस्तीपटूंचे हसू हिरावले आहे. आपल्या देशातील महिला कुस्तीपटूंचा आम्हाला तुमच्याप्रमाणेच अभिमान आहे. एक खेळाडू म्हणून पाठिंबा देणे तुमचे कर्तव्य आहे, असेदेखील क्रास्टो यांनी म्हटले आहे.