Worms From Eyes: धक्कादायक! शेतातील कांदे काढणाऱ्या मजुरांच्या डोळ्यातून चक्क निघतायत अळ्या

By

Published : Apr 1, 2023, 12:26 PM IST

Updated : Apr 1, 2023, 2:31 PM IST

thumbnail

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वळण गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांद्याच्या शेतात काम करणाऱ्या मंजुरांच्या डोळ्यातून चक्क अळ्या निघाल्या. मजुरांना पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकाराने मात्र मजूर भयभीत झाले आहेत. राहुरी येथील दहा ते पंधरा शेतमजूर शेतातील कांदे काढण्यासाठी एका शेतात गेले होते. शुक्रवारी दुपारच्यावेळी हे सर्व शेतमजूर शेतीतील कांदे उपटताना यांच्या डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे झाले. यानंतर सर्वच मजुरांच्या डोळ्यांची आग होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्याने काही मजुरांना ठीक वाटले होते. मात्र पुन्हा त्यांच्या डोळ्यात रात्री आग होऊ लागल्याने त्यांना राहुरीतील स्वप्न दृष्टी नेत्रालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. उपचारावेळी लक्षात आले की, या शेत मजुरांच्या डोळ्यांमधून चक्क अळ्यांची अंडी अन आळ्या निघत आहेत. 

Last Updated : Apr 1, 2023, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.