Aurangabad दाट धुक्याच्या चादरीत हरवले गाव, रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता - rabi crops
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद गंगापूर तालुक्यात ग्रामीण परिसरात आज पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती. पसरलेल्या दाट धुक्याच्या चादरीमुळे गाव आणि शेतीशिवार हरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले. धुक्याची चादर इतकी दाट होती की, 10 ते 15 फुटावर दिसणेही मुश्किल झाले होते. पहाटेपासून पसरलेल्या दाट धुक्याच्या चादरीमुळे सकाळी 8 वाजेच्या दरम्यान सूर्यदर्शन झाले. या धुक्यामुळे रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धुक्याने रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पहाटेपासूनच पसरलेल्या दात धोक्याच्या चादरीमुळे रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. या हंगामात येणाऱ्या कांदा, हरभरा, ज्वारी, गहू, तूर, या पिकांवर धुक्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे. उन्हाळा कांदा लावण्यासाठी पेरलेल्या कांदा रोपावर या धुक्याचा मोठा परिणाम दिसून येतो. सतत पडलेल्या धुक्यामुळे कांदा रोपाची पात करपू लागल्याने शेतकऱ्यांना कांदा रोपावर फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात अधिकची वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता या धुक्यामुळे पुन्हा संकट आलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST